अवैध दारू विक्री सह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी खेडच्या एका इसमावर गुन्हा दाखल

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१९ मार्च २०२२

भिमाशंकर


खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमा भागात अवैध दारू विक्री करत असलेल्या इसमावर कारवाईसाठी गेलेल्या घोडेगाव पोलिसांना तुमची हद्द नाही,तुम्ही कारवाई करू शकत नाही असे म्हणून, दमदाटी केल्याबद्दल,अवैध दारू विक्री सह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी खेडच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी दिली .

भीमाशंकर या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या,घोडेगाव भीमाशंकर रस्त्यालगत, खेड हद्दीमध्ये राहण्यास परंतु दारूविक्री आंबेगाव तालुक्यामध्ये करणाऱ्या इसमाने, गेल्या अनेक वर्षापासून हद्दीच्या कारणावरून त्यापरिसरामध्ये हैदोस घातला होता. सदरचा आरोपी पोलीस ठाणे व तालुका हद्दीवरून पोलिसांनाही जुमानत नव्हता. जंगलामध्ये विशिष्ट लोकांनाच दारू देत असल्यामुळे त्याच्यावर कारवाईसाठी अनेक वेळा प्रयत्न करूनही यश येत नव्हते

काल दि१७ रोजी तळेघर येथील बाजार असल्यामुळे तिटकारे नावाच्या दारूविक्री करणाऱ्यावर, पोलीस विशेष लक्ष ठेवून होते,कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना तुमची हद्द नाही त्यामुळे तुम्ही ते कारवाई करू शकत नाही असे म्हणून दमदाटी करणाऱ्या रोहिदास मुरली तिटकारे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत खेड पोलीस ठाणे येथे भा.द.वि कलम ३५३,५०४, ५०६ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा ६५ ई नुसार,घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,दाबेवादी नायफड ता. खेड गावच्या हद्दीतील अरोपी रोहिदास मुरलीधर तिटकारे यांच्याकडे ८४० रुपये जी. एम संत्रा कंपनीच्या १४ देशी दारुच्या बाटल्या तसेच ३२० रु किमतीच्या मेक डॉल नंबर वन कंपनीच्या २ दारूच्या बाटल्या असा एकूण ११६० रु किमतीचा माल मिळाला असुन खेड पोलिसांनी तो ताब्यात घेतलाय. या घटनेचा अधिक तपास खेड पोलिस स्टेशनचे साहायक पोलीस निरिक्षक काबुगडे हे करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *