होळी आणि धूलिवंदन सण शिरदाळे येथे विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१९ मार्च २०२२

आंबेगाव


आपला ग्रामीण भाग आजही पारंपरिक पद्धतीने विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यात शिरदाळे गावामध्ये कायम असे विविध कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येत साजरे केले जातात. दोनशे वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेला धुलिवंदन सण यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. पारंपरिक वाद्यांच्या तालात गावच्या वेशीतून वीर देवांची भव्य मिरवणूक काढून त्यांची पूजा करून तळी भंडार करण्यात आला. गावातील लहान मुलांना देवाचा वेष परिधान करून त्याची मिरवणूक काढली जाते त्यानंतर गावच्या चौकात जेष्ठ मंडळी आपल्या जुन्या आठवणी जागवताना घाई धरून ढोल लेजिम खेळले जाते आणि मग सर्व देवांना घरी नेऊन सुवासिनी त्यांची पूजा करून कार्यक्रमाची सांगता केली जाते.

वीर देवाच्या मिरवणुकीची परंपरा यावर्षी ही कायम तर महिलांसाठी खास होम मिनिस्टर चा कार्यक्रम

तसेच यावर्षी पासून शिरदाळे ग्रामपंचायत च्या पुढाकाराने होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी महिलांसाठी खास होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्षे महिलांना काहीही विरंगुळा मिळाला नसल्याने त्याच्या आनंदासाठी सरपंच सौ.वंदना तांबे,उपसरपंच मयुर सरडे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. यात विजेत्या महिलांना रोख रक्कम आणि मानाची पैठणी देण्यात आली. यात प्रथम क्रमांक सौ.पुष्पा वसंत तांबे यांनी मिळवला तर द्वितीय क्रमांक सौ.सविता संदीप मिंडे आणि तृतीय क्रमांक सौ.कांताबाई रामदास तांबे यांनी पटकावला. यावेळी सरपंच वंदना तांबे,उपसरपंच मयुर सरडे,मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,ग्रा. पंचायत सदस्य बिपीन चौधरी, ग्रा.पं. सदस्य मोहिनी तांबे,पोलीस पाटील कल्पना चौधरी,सोसायटी संचालक कोंडीभाऊ तांबे,जयदीप चौधरी,बाळासाहेब ठकाराम रणपिसे,मा.सरपंच विजया चौधरी,जिजाबाई तांबे,सोनाली तांबे,सुनीता चौधरी या सर्व माजी सरपंच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आंबेगाव भूषण निलेश पडवळ यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *