नगर-कल्याण महामार्गावर पिकअप व मारुती कारचा भीषण अपघात

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१९ मार्च २०२२

आळेफाटा


लवणवाडी (ता. जुन्नर) येथील शुक्रवार (दि.१८) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पिकप व मारुती कारचा समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच मृत्यू पावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मारुती कार एमएच ४६ बीई ०६५७ व पिकअप क्रमांक एमएच १६ सिडी ०९१० या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून प्रचंड नुकसान झालं आहे. अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरवर पसरला गेला. यामध्ये एक जण मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली तसेच एक गंभीर जखमी असल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांत शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *