देशात चार राज्यात “चौफेर” घोडदौड नंतर भाजप चे “मिशन महाराष्ट्र”

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ मार्च २०२२

पिंपरी


नुकत्याच पाच राज्यात निवडणुकीचे निकाल लागले. त्यात चार राज्य काबीज केल्यानंतर सगळीकडे भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला. पंजाब वगळता सगळीकडे सत्ता स्थापणेपर्यंत प्रचंड मुसंडी मारली. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास आणि उत्साह इतका वाढला की उत्तर प्रदेश तो झाकी है अभि महाराष्ट्र बाकी है असा नारा सुरू झालाय.

देशात सर्वात महत्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश ज्यांच्याकडे उत्तर प्रदेश त्याची देशात सत्ता अशी अटकळ लावली जाते. भाजपने आपली सगळी ताकद तन, मन, धन लावून उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मागे लावली. भाजपचे मिशन पुन्हा योगी यांना मुख्यमंत्री करण्याचे होते. त्यात ते सगळे फंडे वापरून सफल झाले. २०१७ पेक्षा कमी आमदार निवडून आले असले तरी उत्तर प्रदेश मध्ये खुप वर्षांची परंपरा आहे येथे एकदा झालेला मुख्यमंत्री पुन्हा रिपीट होत नाही. पण याला छेद देत योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्ववाद आणि नागिरीकांसाठी विविध घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला. तेथील जनता योगींचे राशन, मोदींचे भाषण याच्या प्रेमात पडली आणि भरभरून मते दिल्याचे समोर आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर बोलताना उत्तर प्रदेशचा निकाल म्हणजे २०२४ चा लोकसभेच्या निकाल आहे असे स्पष्ट संकेतच दिले. त्यांच्या या आत्मविश्वासांतर देशात भाजपचा उत्साह दुणावला त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तर आता उत्तर प्रदेश झाकी है महाराष्ट्र अब बाकी है या कार्यकर्त्यांच्या घोषणेला दुजोरा देत म्हणाले महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होऊ शकते. उत्तर प्रदेश नंतर सर्वात मोठे राज्य भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र आहे. सर्वात जास्त संख्याबळ असतानाही शरद पवारांच्या चाणक्य नितीमुळे भाजपला विरोधात बसावे लागले आहे. याचे शल्य फडणवीसांच्या जहरी लागले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी पाच वर्षे आघाडी सरकार टिकू द्यायचे नाही असा चंग फडणवीसांनी बांधला आहे. फोडा झोडा तत्वानुसार केव्हा ईडी तर केव्हा आमदार फोडीचे तंत्र राबवण्याचे भातखंडे राबवताना दिसत आहेत. आता या लागलेल्या निकालानंतर आणि गोव्याची जबादारी चोख बजावल्यानंतर तर त्यांचे मनोधर्य खुप उंचावले आहे. त्यामुळे कोणत्याही परस्थितीत महाविकास आघाडी सरकार पडायचे आणि महाराष्ट्र पण जिंकला हे पंतप्रधान मोदींना दाखवून द्ययाचा जणू विडाच उचलला आहे. महाविकास आघाडी मधील १७ आमदार त्यांच्या अगदी संपर्कात असल्याचे नेहमी बोलले जाते. आणि काहीही झाले तरी महाविकास सरकार पाडून भाजपचे सरकार येणार असल्याची ललकर देवेन्द्र करत आहेत. त्याला राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे स्वप्नच राहणार असल्याचे सांगतात. आता येणारा काळच सांगेन हे सरकार पडणार की ५ वर्ष पूर्ण करणार.

सतत भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर भाजप बॅकफुटला गेली होती. त्यांच्या नगरसेवकांनी एकामागून एक राजीनामे दिले. काही नगरसेवक नगरसेविका राजीनामे देण्याच्या पवित्र्यात होते. परंतु पाच राज्याच्या निकालानंतर पिंपरी चिंचवड शहरात भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण आणि उत्साह पाहायला मिळत आहे. कोणत्याही परस्थितीत आणि काहीही झाले तरी दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली आब की बार १०० पार चा नारा लावताना दिसत आहेत.

इकडे शहर राष्ट्रवादी मध्ये खांदे पालट झाल्यानंतर आणि निवडणूक जवळ आल्याने आक्रमकता वाढली आहे. नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वात भाजप च्या भ्रष्टाचारविरोधात आंदोलनाला धार आलेली पाहायला मिळत आहे. भाजपने केलेल्या कामात कसे आणि कुठे भरष्टाचार झाले हे शहरातील नागरिकांसमोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजकडून त्यांना प्रतिउत्तर देत नुसते बिनबुडाचे आरोप करणे थांबवा, पुरावे देऊन आरोप सिद्ध करण्याचे आव्हान राष्ट्रवादी ला देण्यात आले. या आरोप प्रत्यारोपात नागरिकांना मूलभूत गरजांपैकी एक स्वच्छ आणि दररोज पाणी पुरवठा व्हावा ही साधी बाब ही पूर्ण करू शकत नाहीत ही खंत आहे. एकीकडे राष्ट्रवादी कडून यावेळी आम्हीही १०० चा आकडा पार करणार असल्याचे नारा देण्यात येत आहे. एकेकाळी श्रीमंत असलेल्या या पालिकेला आता उत्पन्न कमी असल्याचे डबघाईला आल्याचे चित्र पाहायला मिळते. अगदी निवडणुका लागतील अशी परिस्थिती असताना राज्य सरकारच्या निर्णयामुळे निवडणुका ६ महिने पुढे ढकलल्या गेल्याने जे गुढग्याला बाशिंग बांधून आणि खर्च करून तोंडाला फेस आलेल्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे.

पंजाब मध्ये आप ने करिश्मा केला. नागरिकांना मूलभूत गरजांच्या जोरावर निवडणूक लढवली. त्यात ठराविक युनिट पर्यंत मोफत वीजपुरवठा, खाजगी शाळांचा तोडीचे शिक्षण सरकारी शाळेत मोफत शिक्षण. प्रत्येक महीलेच्या नावावर बँकेत प्रत्येक महिन्यात ठराविक रक्कम, मोफत दर्जेदार आरोग्य सेवा यांच्या जोरावर खर्च न करताही तरुण कार्यकर्त्यांच्या जोरावर सगळ्याच पक्षांचा सुफडा साफ केला. आणि पैशाशिवाय निवडणूका लढवता येतात आणि जिंकूनही येतात हे दाखवून दिले. आणि एकहाती सत्ता पंजाब मध्ये आणली हा सगळ्या देशात चर्चेचा विषय झाला.

आता पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १३ मार्च ला पालिकेची मुदत संपल्यानंतर बरखास्त झालेवर खरी कसोटी लागणार ती आयुक्त राजेश पाटील यांची. प्रशासन लागल्यानंतर पालिकेचे सर्व अधिकार आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे येतील. त्यानंतर ते कसे निर्णय घेतात याकडे शहर वासीयांचे डोळे लागले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *