भीमाशंकर येथील १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेसाठी भाविकांना विशेष सुविधा असणार नियोजन बैठकीत निर्णय

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१५ फेब्रुवारी २०२२

भिमाशंकर


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने,प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दि.१ मार्च रोजी होणारी महाशिवरात्र यात्रा मोठी होणार आहे. यादृष्टीने सर्व विभागांनी नियोजन करावे अशा सुचना महाशिवरात्र यात्रा नियोजन बैठकीत देण्यात आल्या आहे.

दि. २६,२७ रोजी शनिवार, रविवार सुट्टी आहे तर दि. २८ रोजी महाशिवरात्रीचा आदला दिवस व दि.१ मार्च रोजी महाशिवरात्र होणार आहे. अशा सलग चार दिवस सुट्टया आल्या असल्याने तसेच नुकत्याच पंढरपुर व इतर ठिकाणी झालेल्या यात्रांमधील गर्दि पहाता भीमाशंकर मध्ये मोठया संख्येने भाविक येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक विभागाला त्यांच्याकडील कामांच्या सुचना देण्यासाठी व याचा आढावा घेण्यासाठी घोडेगाव येथे शासकीय विश्रमागृहात खेड व आंबेगाव तालुक्यातील अधिकारी, देवस्थान ट्स्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांची बैठक झाली. याबैठकीस आंबेगावचे प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर, खेडचे प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दषन पाटील, देवस्थानचे अध्यक्ष अँड.सुरेष कौदरे, तहलिसदार रमा जोशी, वैषाली वाघमारे, उपअभियंता एस.बी.पटाडे, जे.डी.कचरे, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता शैलेष गिते,पोलिस निरीक्षक सतिश गुरव, सतिश होडगर, किशोर वागज, विष्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रय कौदरे, उदय गवांदे इत्यादी उपस्थित होते.

सर्व विभागांचा समन्वय रहावा यासाठी मंदिराजवळ नियंत्रण कक्ष नेमला जाणार असून येथे प्रत्येक विभागाचा अधिकारी थांबून आपल्या कामाचे नियोजन करत राहिल. तसेच महाशिवरात्रीसाठी चार दिवस बंदोबस्त लावावा लागणार आहे, यासाठी घोडेगाव पोलिस ठाण्याने १६६ तर खेड पोलिस ठाण्याने १३० पोलिस कर्मचा-यांची मागणी केली आहे. तसेच एसटि महामंडळ वाहनतळ ते मंदिर वहातुकीसाठी १५ मिनीबस ठेवणार आहे मात्र यामध्ये भाविकांची वहातूक शक्य होणारी नाही, यासाठी अजून मिनीबस ठेवण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले. तसेच विद्युत वितरण कंपनीने लाईट संदर्भातील सर्व अडचणी सोडवाव्यात व चार दिवस लाईट जाणार नाही याचे नियोजन करावे. तसेच वन्यजिव विभागाच्या हद्दीतील कचरा उचलण्याचे काम वनविभागाने करावे व इतर ठिकाणचा कचरा देवस्थान मार्फत उचलला जावा अशा अनेक सुचना देण्यात आल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *