बिबट प्रकल्पासाठी आमदार अतुल बेनके यांचा आंबेगव्हान परिसराचा पुन्हा दौरा

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
१८ एप्रिल २०२२ 

जुन्नर


जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी वन अधिकाऱ्यां समवेत आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्पासाठी आणखी काही जागांची पाहणी केली. याअगोदरही बेनके यांनी तालुक्यातील काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काही जागांची पाहणी केलेली होती. बिबट सफारी प्रकल्पाच्या दृष्टीने जागा निश्चिती करण्याकामी पूर्ण सकारात्मकतेने अधिकारी वर्गासमवेत काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शासनही या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.


या पाहणी दौऱ्यावेळी आमदार बेनके यांच्या समवेत जुन्नर वन विभागाचे उपवनरक्षक अमित भिसे , नागपूर अभियांत्रिकी अश्फाक अहमद,ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे,पर्यटन अभ्यासक शेखर नलावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बिबट सफारी प्रकल्पाविषयी काही महत्वपूर्ण निर्णयांची खूणगाठ मनात बांधून ही सर्व टीम आल्या पावली परतली. दरम्यान अद्यापही आंबेगव्हाण येथेच बिबट सफारी प्रकल्पासाठी योग्य जागा असल्याचा सूर संपूर्ण तालुक्यातील जनता जनार्दनाने जनमतातून व्यक्त होताना ऐकिवात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *