आचारसंहितेमुळे महापौर व अधिकाऱ्यांच्या गाड्या घेतल्या काढून तर सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीची मिटिंग तहकूब होण्याची शक्यता

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी : दि ३ नोव्हेंम्बर पदवीधर विधानपरिषद निवडणुक आचारसंहितेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या मोटारी आज काढून घेण्यात आल्या.

त्यामुळे त्यांना खासगी वाहनाने यावे लागले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या राज्यातील पाच जागांच्या या निवडणुकीमुळे वर्षभरातच पालिका पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने दुसऱ्यांदा काढून घ्यावी लागली आहेत. आचारसंहितेमुळे उद्या होणारी स्थायी ची सभा होते की नाही यावर अजून साशंकता आहे स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांच्याशी बोलले असता ते म्हणाले अजून आम्हांला शासनाकडून तसे परिपत्रक आले नसून उद्या आयुक्त शासनाकडे चौकशी करून आम्हांला सांगतील.