बारा वर्षानंतर नगरसेविका सौ. कमल घोलप व नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली १०४ जणांना हक्काची घरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ नोव्हेंबर २०२१

निगडी


सेक्टर नं २२ (संग्रामनगर- त्रिवेनिनगर- अंकुश चौक) या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या १०४ कुटुंबांना महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर मिळणार आहेत. नगरसेवक प्रा उत्तम केंदळे गेली अनेक वर्ष झाले गरिबांना घरे मिळावे यासाठी पाठपुरावा करत होते. नुकत्याच झालेल्या लकी ड्रॉ मध्ये SRA प्रकल्पाअंतर्गत गरिबांना घरे मिळाली याची माहिती देण्यासाठी क्रिडा सभापती दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. हक्काची घरे मिळाल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडा सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका कमलताई घोलप, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, संजय वाघमारे व लाभार्थी उपस्थित होते.

निगडीतील भाजपाचे शिलेदार नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व बापू घोलप यांचे लाभार्थ्यांनी मानले आभार

सेक्टर नं २२ (संग्रामनगर- त्रिवेणीनगर- अंकुश चौक( या झोपडपट्टी भागात ३६५ घरे आहेत. २००९ साली JNNURM प्रकल्पाअंतर्गत १९३ नागरीक पात्र ठरले होते.२०११ साली दोन सोसायट्यांचा लकी ड्रॉ करण्यात आला होता. घरे मिळालेल्यांचे कर्ज मंजूर झाले होते. रेडझोन ची याचिका दाखल झाल्यामुळे तीन बिल्डिंग तशाच पडून राहिल्या. २०११ चा लकी ड्रॉ झाल्यापासून आतापर्यंत ४५ आंदोलने, मोर्चे, बेमुदत धरणे आंदोलन करून देखील नागरिकांना न्याय मिळत नव्हता. ऑटो क्लस्टर येथे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर, नगरसेवक केंदळे, घोलप तसेच सर्व नगरसेवक अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या. परंतु घरे मिळण्याचा तोडगा निघाला नाही.

गोरगरिबांना घरे मिळून देण्यातच आनंद – नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व कमल घोलप

हर्डीकर यांची बदली झाल्यानंतर लगेच आयुक्त राजेश पाटील रुजु झाले आणि त्यांच्या समोर नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पानपाटील यांनी घरांचा प्रश्न उपस्थित केला. आयुक्त नवीन असल्यामुळे त्यांच्या समोर बैठका व प्रश्न मांडण्यात दोन महिने वेळ गेला. त्यानंतर एका झालेल्या बैठकीत राजेश पाटील यांनी तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी एस आर ए प्रकल्प, पी एम वाय योजनांतर्गत किंवा न्यायालयात याचिका दाखल करू असे आश्वासन दिले होते.नगरसेवक प्रा. केंदळे व नगरसेविका कमल घोलप हे वारंवार आयुक्त व महापौरांकडे पाठपुरावा करत होते. त्यानंतर आता कुठेतरी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी १६० पैकी १०४ लाभार्थींचे लकी ड्रॉ द्वारे विठ्ठल नगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पाटील व संजय वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळेच हे यश मिळाले आहे.

लाभार्थी संजय वाघमारे…

अजंठानगर पत्रा शेड हे 20 ते वर्षापूर्वीचे आहे. नागरिकांचेही लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे. घरांसाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या गाड्या आम्ही अडवलेल्या आहेत. आयुक्तांच्या दालनासमोर आम्ही आमचा संसार थाटून आंदोलने केली.आम्ही अनेक लोक प्रतिनिधी कडे गेलो पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जे काही सहभाग नसतानाही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी श्रेय लाटू नये. घरे मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते मा आयुक्त राजेश पाटील, प्राध्यापक उत्तम केंदळे,कमलाताई घोलप,वंचित बहुजन आघाडीचे गुलाब पानपाटील यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.

नगरसेवक प्राध्यापक उत्तम केंदळे…

माझ्या नगरसेवक कारकीर्तिमध्ये गोरगरिबांना घरे मिळवून देऊ शकलो याचा आनंद झाला आहे.१०४ कुटुंबाचे विठ्ठल नगर येथे पुनर्वसन झाले आहे अजून अपात्र राहिलेल्या कुटुंबाचेही पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागातील नागरिकांना पुनर्वसनाद्वारे घर मिळवून दिल्यामुळे याचा अनुभव व आमदार महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. अनेक वर्ष झाले आयुक्त व महापौर यांच्याशी पत्रव्यवहाराद्वारे व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करत होतो याचे आज चीज झाल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण करू नये. सहकार्य केल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांना धन्यवाद देतो.

नगरसेविका कमलताई घोलप…

गेली चार वर्ष झाले आयुक्त हार्डिकर असल्यापासून गरिबांच्या घरासाठी पाठपुरावा करत होतो. हर्डीकर यांनी नकारात्मक भूमिका घेतली तरी आम्ही थांबलो नाही. अखेर राजकीय वारसा नसताना यश मिळाले व नागरिकांना हक्काची घरे मिळाली याचा आनंद झाला आहे. आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांचे आभार मानतो. राहिलेल्या नागरिकांच्या घरासाठी लढा हा चालूच राहील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *