विघ्नहर च्या फाट्यावर गतिरोधक बसवा

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
२२ नोव्हेंबर २०२१

ओझर


नारायणगाव – ओझर रस्त्यावरील विघ्नहर कारखाना चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने वाहनांच्या वेगावर मर्यादा घालण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी कारखाना परिसरातील नागरिकांकडून होत आहे . विघ्नहर कारखाना फाटा (धनगरवाडी) चौफुला रस्त्यावर येडगाव, नारायणगाव ,जुन्नर व ओझर या चार दिशांना जाण्यासाठी रस्ते आहेत. शिवाय अष्टविनायकापैकी ओझर ,लेण्याद्री देवस्थान व विघ्नहर सहकारी साखर कारखाना जवळ असल्याने या चौकातून पर्यटक स्थानिक रहिवासी ,ऊस वाहतूक व मालवाहतूक तसेच पर्यटक व स्थानिक वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

 

आज पर्यंत झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे .या चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी प्रशासनाकडे अनेक वेळा करण्यात आली ,परंतु प्रशासन अष्टविनायक रोडचे ठेकेदार ,स्थानिक नेते मंडळी याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आले आहे . गतिरोधक बसवा अन्यथा रस्ता रोको करण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे .या संदर्भात मोहटादेवी व्यापारी मित्र मंडळाचे राजेंद्र खिलारी ,प्रवीण शिंगोटे ,महेश मोढवे ,मच्छिंद्र शेळके ,हनुमान शेळके ,पांडुरंग शेळके ,मारुती भोर ,प्रवीण चव्हाण, शशिकांत वाळुंज यांनी सरपंच ,ठेकेदार बेल्हेकर सार्वजनिक बांधकाम विभाग ,आमदार अतुलशेठ बेनके ,खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना याबाबतचे तसे निवेदन दिले आहे.