सोन्याचे अडीच तोळे वजनाचे दागिने व दोन मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२२ नोव्हेंबर २०२१

नारायणगाव


सुमारे २ वर्षांपूर्वी भर वस्तीत राहणाऱ्या कुटुंबाच्या घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व दोन मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गंठण व दोन मोबाइल नारायणगाव पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत करून सर्व मुद्देमाल मूळ मालकाला आज पोलीस स्थानक आवारात परत दिला. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पोलिसांकडून मूळ मालकास मुद्देमाल परत

याबाबत माहिती अशी की, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८१/२०२० नुसार भारतीय दंड विधान कलम ३८० प्रमाणे फिर्यादी मंदार श्रीकांत दिवटे (रा. वाजगे आळी, नारायणगाव) यांच्या राहत्या घरातून सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व दोन मोबाईलची आरोपी सागर मनोज विटकर व एक अन्य आरोपी (दोघेही रा. नारायणगाव) यांनी चोरी केली होती. चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर जुन्नर न्यायालयाच्या आदेशान्वये मंदार दिवटे व त्यांच्या पत्नी जयश्री दिवटे यांना आज मुद्देमाल परत देण्यात आला. हा ऐवज देते प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, पोलिस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आपला मूळ मुद्देमाल परत मिळाल्या बद्दल दिवटे कुटुंबीयांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *