आळे येथील श्री रेडा समाधी मंदिरात आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते अभिषेक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१६ नोव्हेंबर २०२१

आळेफाटा


भागवत एकादशीनिमित्त सोमवार (दि.१५) रोजी श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. भाविकांनीही येथे सकाळपासून दर्शन घेतले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने व निर्बंध शिथील केल्याने आळे येथे ही दर्शनासाठी येणा-या भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळीच आमदार अतुल बेनके यांचे हस्ते वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान अध्यक्ष चारूदास साबळे, सचिव संतोष पाडेकर,उपसरपंच अँड विजय कु-हाडे विश्वस्त, धनंजय काळे, म्हतुजी सहाणे, बाळासाहेब शेळके, गोरक्ष गुंजाळ, गोरख दिघे, बाळशिराम डावखर, बाजीराव निमसे राजाभाऊ सहाणे, राजेंद्र धोंगडे व्यवस्थापक कान्हू पाटील कु-हाडे ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

यावेळेस आमदार अतुल बेनके यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगत मंदिर परिसरात येणा-या रस्त्याची सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *