महागाई विरोधी शहर कॉंग्रेसचा जनजागरण अभियान पंधरवडा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


केंद्रामध्ये गेली सात वर्ष भाजपाचे सरकार आहे. तसेच भारतात अनेक राज्यात भाजप विरोधी सरकार आहेत. केंद्र सरकार भाजप विरोधी सरकार असणा-या राज्यांमध्ये राजकीय कुटील हेतूने कृत्रिम भाववाढ करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर भाजप विरोधी राज्यांमध्ये महागाईने कळस गाठला आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होत आहे. सामान्य नागरिकांना रोज वाढत जाणा-या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीमुळे जगणे मुश्किल झाले आहे. नागरिकांचा हा आक्रोश केंद्र सरकारच्या कानी जावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने १४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागरण अभियान सुरु केले आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शहरभर पदयात्रा, कोपरा सभांचे आयोजन केले आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Janajagaran Abhiyan fortnight of anti-inflation city Congress
महागाई विरोधी शहर कॉंग्रेसचा जनजागरण अभियान पंधरवडा

या जनजागरण अभियान अंतर्गत रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी १० वा. नेहरु नगर, पिंपरी येथिल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे. सकाळी १०.१५ वा. चिंचवड स्टेशन येथिल आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे. सकाळी १०.४५ वा. थेरगाव येथिल पडवळनगर – रहिवाशी मजीद – बारणे कॉर्नर – अनुसया मंगल कार्यालय, थेरगाव पर्यंत पदयात्रा. सकाळी ११.४५ वा. अनुसया मंगल कार्यालय, थेरगाव येथे कोपरा सभा थेरगाव, चिंचवड ; मंगळवारी (दि. १५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. चौधरी पार्क, पेट्रोल पंपाजवळ, वाकड कोपरा सभा ; बुधवारी (दि. १७ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. भारत माता चौक, काळेवाडी परिसरात पदयात्रा ; गुरुवारी (दि. १८ नोव्हेंबर) सकाळी ९ वा. प्रभात फेरी – विठ्ठल मंदिर आकुर्डी, बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमान्य हॉस्पिटल, सावरकर भवन ते गणेश तलाव, प्राधिकर ; सकाळी ११.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महागाईच्या निदर्शने, सकाळी ११.३० वा. सावित्रीबाई फुले स्मारक, कामगार भवन शेजारी पिंपरी येथे महिला मेळावा, सायंकाळी ७ वा. ज्योतिबा नगर, पीसीएमसी शाळा, कृष्ण मंदिर शेजारी काळेवाडी गावठाण, कोपरा सभा ; शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. पदयात्राचे रुपांतर कोपरा सभा काकडे पार्क चौक, चिंचवडगाव ; रविवारी (दि. २१ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वा. चौधरी वजन काटा, कुदळवाडी, चिखली, सायंकाळी ७.३० वा. पिंपरी गाव कोपरा सभा; सोमवारी (दि. २२ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वा. भाटनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरी कोपरा सभा, सायंकाळी ७ वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भोसरी येथे कोपरा सभा ; मंगळवारी (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वा. कृष्णा चौक, सांगवी, पिंपळे गुरव येथे कोपरा सभा ; बुधवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वा. साने चौक (भाजी मंडई) येथे कोपरा सभा ; गुरुवारी (दि. २५ नोव्हेंबर) सकाळी ११ वा. मोर्चा म्हाळसाकांत कॉलेज चौक ते तहसीलदार कार्यालय, आकुर्डी ; शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. विकास नगर ते मुकाई चौक, किवळे येथे पदयात्रा. सायंकाळी ७ वा. मुकाई चौक, बीआरटी बस स्टॉप, किवळे कोपरा सभा ; रविवारी (दि. २८ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. प्राधिकरण, कोपरा सभा, सायंकाळी ८ वा. डिलक्स चौक, पिंपरी, कोपरा सभा होणार आहेत. तसेच अभियानाचा समारोप सोमवारी (दि. २९ नोव्हेंबर) पिंपरीत भव्य सभेने करण्यात येणार आहे.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *