सख्खा बापच बनला सख्ख्या मुलाचा वैरी

०२ नोव्हेंबर २०२२

सुदुंबरे


घरगुती वादातुन आरोपी वडीलाने सुदुंबरे बोरकर वस्ती येथील स्वतःच्या मुलाच्या डोक्यात लाकूड तोडण्याची कु-हाड डोक्यात घालून त्याचा निर्घुण खुन केला आहे. ही घटना दि. १ नोव्हेंबर 2022 रोजी, तीन वाजेच्या सुमारास सुदुंबरे गावातील फिर्यादीच्या राहत्या घरी, बोरकर वस्ती येथे घडली.समिर बाळु बोरकर वय ३४ वर्षे खून झालेल्या मयत मुलाचे नाव आहे. २८ वर्षीय महिला फिर्यादीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बाळु बबन बोरकर वय ५५ वर्षे, रा. बोरकरवस्ती, सुदुंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *