कोरोनामध्ये दिवंगत झालेल्यांना वाढदिवस समर्पित – यशवंत भोसले

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २८ सप्टेंबर २०२१
संत तुकाराम नगरच्या परिसरात संध्याकाळच्या वेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.
एवढ्या प्रचंड गर्दीतही परिसरांत निरव शांतता पसरली होती. यशवंतभाऊंनी श्रद्धांजलीसाठी सर्वांच्या हातात असलेल्या मेणबत्त्या शिलगविण्याची विनंती केली. एकसाथ शेकडो मेणबत्त्यांचा प्रकाश पसरला. पण त्या प्रकाशात कोरोना काळात ज्यांचे जीवलग सोडून गेले होते त्यांच्या आप्तांच्या अनावर झालेल्या भावना दिसत होत्या.
या प्रसंगाचे औचित्य होते, महाराष्ट्रातील कामगार नेते यशवंत भोसले यांचा वाढदिवस. पण कोठेही रोषणाई नव्हती की, फटाक्यांची अताषबाजी नव्हती. यशवंत भोसले यांनी आपला हा वाढदिवस कारोना काळात संत तुकाराम नगर, महेश नगर, एच ए कॉलनी, हाफकीन, वल्लभनगर तसेच पिंपरी चिंचवड परिसरांतील जे लोक दगावले आहेत त्यांना समर्पित केला होता.

डोळ्यातून ओघळणारे आसवे कशीबशी रोखत दिवंगतांचे आप्त सांगत होते आपला वाढदिवस कोरोना काळातील दिवंगतांना समर्पित करणारे यशवंतभाऊ भोसले हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरांत वाढदिवसाची फ्लेक्सबाजी करण्याऐवजी भाऊंनी दिवंगतांची छायाचित्रे असलेले आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते. हा संपूर्ण परिसर भाऊंचा वाढदिवस असतानाही दिवसभर भावनाविवश झालेला दिसला.
यावेळी जन समुदायासमोर बोलताना कामगार नेते यशवंत भोसले म्हणाले की, कोरोना काळात जे दगावलेले ते सर्वजण माझे कुटुंबातील होते. आहेत. या प्रत्येकाच्या सुखदुःखात मी गेली पस्तीस वर्षे सातत्याने सहभागी आहे यामुळेच या सर्वांच्या जाण्यामुळे मी हा वाढदिवस साजरा न करता त्यांना समर्पित करत आहे.

या कार्यक्रमास अ‍ॅम्युनिशियन फॅक्टरी कामगार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत धुमाळ,  स्थानिक नगरसेविका सौ. सुलक्षणा शिलवंत धर, शशांक इनामदार, उद्योजक अहमद खान, उद्योजक दिपकशेठ पाटील, दिनेश पाटील, चाकण एमआयडीसीतील उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, अ‍ॅड. सुशिल मंचरकर, अ‍ॅड. सुरज खाडे,  सुजय कुलकर्णी, अ‍ॅम्यु. फॅक्टरी कामगार संघटनेचे पदाधिकारी विजय गायकवाड, बबन अल्हाट, अमित काटे, प्रकाश शिंगटे, राजू कदम, भाजपा व्यापारी संघटनेचे सुधीर अगरवाल, सातारा जिल्हा विकास परिषदेचे किशोर जगदाळे,

सुरज चव्हाण, रोहित खैरे, शितल कुंभार, निलेश अष्टेकर, मधुकर काटे, सतिश एरंडे,विलास ठोंबरे, अमोल घोरपडे, अर्जुन सुद्रीक, आबा खराडे, जयवंत फुलकर, अकाश भोसले, स्वानंद राजपाठक, सूर्या हॉस्पीटल कामगार संघटनेचे अध्यक्ष जयवंत माघाडे, गीता पवार, मधुकर काटे, संजय साळूंके, हनुमंत जाधव, अमोल कुंभार, रेवण गायकवाड तसेच नीर, बारामती, नगर रोड, सातारा येथील अनेक कार्यकर्ते आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *