पारगावात पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळकटीकरण या विषयावर मार्गदर्शन

आपला आवाज न्यूज नेटवर्क

बातमी
दि.27/9/2021

पारगावात पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळकटीकरण या विषयावर मार्गदर्शन

बातमी:- रामदास सांगळे,विभागीय संपादक,जुन्नर

पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे ग्रामसंसद सभागृहात मीना शाखा कालव्यावरील पाणी वापर संस्थासाठी पाणी वापर संस्था सक्षमिकरण व बळकटीकरण या विषयावर उत्तम साळुंखे उप विभागीय अधिकारी अहमदनगर यांनी २००५ च्या कायद्यातील महत्वाच्या कलमांवर मार्गदर्शन केले.साळुंखे यांनी मायनर वरील अतिक्रमण, पिक स्वातंत्र्य, पाण्याचा संयुक्त वापर,पाण्याची बचत व काटकसर,निधीची उभारणी, संस्थाचे कार्य कर्तव्य व जबाबदारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. पाण्या संदर्भात व कालवा चारी पोटचारी विषयीचे शेतक-यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे साळुंखे यांनी निरसन केले. कार्यक्रमाच्या दरम्यान सर्व पाणी वापर संस्थांनी संस्थेचा प्रत्येक हंगामाचा पाणी अर्ज वेळेत भरून पाटबंधारे विभागाकडे जमा करून पाण्यावरील आपला हक्क अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला.या कार्यक्रमाप्रसंगी मीना शाखा कालव्यावरील २८ पैकी २३ पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व संस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मोजणीदार सुभाष झिजाड यांचा संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शाखा अधिकारी सुनिल दाते,उद्योजक संभाजी चव्हाण, उपसरपंच रामदास तट्टू, आबाजी पोखरकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डुकरे, सुभाष झिंजाड, मीना शाखा कालवा शाखा सचिव पांडुरंग डुकरे,तसेच मीना शाखा कालवा वरील नारायणगाव,शिरोली,जांबुत, टाळकी हाजी येथील शाखांचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी भुषवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *