पिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये

बातमीदार : रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये – महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी चिंचवड – नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या दिवाळी नंतर वाढलेली दिसून येत आहे. मागील गणेशोत्सवाचा अनुभव लक्षात घेता उत्सवानंतर वाढलेली रुग्ण संख्या दिवाळीनंतरच्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये, असे आदेश महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले आहेत.

मुलांच्या पालकांवर किंवा संमतीने शाळा उघडणे चुकीचे होवू शकते. मुळात शाळा उघडल्याने आपण प्रशासन म्हणून मुलांच्या आरोग्याशी खेळ करतो की काय? असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होवू लागला आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सूरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यात संस्था चालक, पालकांच्या बरोबर सर्विस्तर चर्चा करूनच निर्णय घेण्यात येवू. शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे शासन आदेशात नमूद केलेले असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात येत आहे, असे महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.