सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तीमत्व सदाशिव नेवकर यांचे निधन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक

नारायणगाव

रायणगाव येथील संत सेना महाराज नाभिक संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदाशिव नेवकर यांचे बुधवार दिनांक २२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सदाशिवदादा यांनी नारायणगावात सामाजिक सलोका राखण्यासाठी योगदान दिले. संत सेना महाराज मंदिर उभारणीसाठी व नारायणगाव वारूळवाडी या दोन गावांना जोडण्याकरिता नदीवर पूल बांधण्यासाठी त्यांनी स्वमालकीची जागा समाजासाठी अर्पण केली.

अध्यात्मिक प्रवृत्तीचे असणाऱ्या सदाशिव नेवकर यांचा आयुर्वेदीय उपचार अभ्यास होता. त्यांच्या निधनाने गावातील “ग्राममहर्षी” हरपला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांचे अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीवर न करता नारायणगाव येथील मीना नदीतीरावर पारंपारिक पद्धतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *