महापौरांच्या हस्ते शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान

महापौरांच्या हस्ते शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान
पिंपरी चिंचवड महापौर उषा उर्फ माई ढोरे

“कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षण देणारा शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार” – महापौर उषा उर्फ ‘माई’ ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ७ सप्टेंबर २०२१

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षण देणारा ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते असे गौरदगार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी केले.शिक्षक दिनी शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सांगवी येथे सन्मान करण्यात आला या वेळेस त्या बोलत होत्या.

५ सप्टेंबर शिक्षक दिन व ८ सप्टेंबर राष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून सांगवी भागातील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कै.शंकुतला शितोळे हायस्कूल,जनता शिक्षण संस्थेचे मराठी प्राथमिक शाळा व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळा (म.न.पा.)१७२ या शाळेतील शिक्षकांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला तसेच श्री.प्रा. ॲड.नितिन कदम यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई व गडकोटांचे शिखर सर करण्याचे अर्धशतके पूर्ण झाले त्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला…

महापौरांच्या हस्ते शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान
शिक्षक दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. कोरोना परिस्थिती आसतांना सुध्दा शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहेत अश्या गुरूजनांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे असेही महापौर म्हणाल्या. अशी माहिती पिं. चिं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस जवाहर ढोरे यांनी दिली.

Teachers honored at the hands of the Mayor on Teachers' Day
पीसीएमसीच्या महापौर उषा ‘माई’ ढोरे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसोबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *