मंचर उपजिल्हा रुग्णालयातील नूतन सुविधांचे शनिवारी लोकार्पण…

मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयातील नूतन सुविधांचा लोकार्पण सोहळा राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते तसेच शिरूर लोकसभे चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.२१) रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. देवेंद्रभाई शहा यांनी दिली.
         या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मोरडे फूड्स चे कार्यकारी संचालक हर्षल मोरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
           यावेळी बोलताना श्री देवेंद्रभाई शहा म्हणाले ” मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासूनच उपचार मिळत होते त्यामुळे अन्य रुग्णांना सुविधा मिळत नव्हत्या. अवसरी खुर्द येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात शिवनेरी जम्बो कोविड सेंटर सुरू झालेले असल्याने कोरोना बाधित रुग्णांवर तेथे उपचार करण्यात येणार आहेत”. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, आयुर्वेदिक होमिओपॅथिक विभाग , देवेंद्र शहा फाउंडेशनच्या माध्यमातून ३२ लाख रुपये किमतीच्या कार्डिएक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तसेच मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने उपजिल्हा रुग्णालयासाठी अडीच लाख रुपये खर्च करून २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ही उदघाटन यावेळी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *