जखमी कबुतरास पक्षी मित्रांनी दिले जीवदान

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२६ एप्रिल २०२२

खामुंडी


खामुंडी (ता.जुन्नर ) येथील शेतकरी आनंद बाबुराव आंधळे आणि त्यांचा मुलगा अश्विन आंधळे हे शेतात काम करत असताना त्यांना अचानक एक कबुतर खाली कोसळताना दिसले कदाचित ते कडक उन्हामुळे तहानेने व्याकुळ झालेले असावे तसेच वरून खाली पडताना ते किरकोळ जखमीही झाले होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लागलीच त्यांनी कबुतरास घरी नेऊन त्यास पाणी पाजले व खायलाही दिले तसेच त्यावर प्राथमिक उपचार देखील केले.

जखमी कबुतराबाबत ओतूर विभागाचे वनपाल सुधाकर गिते आणि वनरक्षक अतुल वाघुले यांना संपर्क करून माहिती देण्यात आली असता अतुल वाघुले यांनी जखमी कबुतरास त्याब्यात घेऊन त्यास माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे. बहुतांश वेळा उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते,वेळेत पाणी मिळाले नाही तर उष्णतेच्या दाहकतेने असे प्रकार घडत असल्याचे पक्षी प्रेमींनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *