दि.३१ घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव एकात्मीक आदिवासी प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या,शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव येथील,श्री.एल.सी.केदारी कामाठी हे आज दि.३१ मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.गेले ३८ वर्ष त्यांनी प्रमाणिकपणे सेवा दिली आहे.
यानिमित्ताने कोरोना परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळून साध्या पद्धतीने शुभेच्छा देत आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री. योगेश खंडारे , शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगावचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.एस.एस भोजने. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न झाला.