रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित, सहेली वस्ती शाळेत जागतिक आदिवासी दिन साजरा…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. १०/०८/२०२१.

      ९ ऑगस्ट म्हणजेच जागतिक आदिवासी दिन. या निमित्ताने, रामलिंग महिला उन्नत्ती बहूउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत, सहेली वस्ती शाळेमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी रामलिंग येथे रहात असलेल्या आदिवासी कुटूंबांना, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्यासोबत चर्चा विनिमय करून, उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्याकडूनच त्यांच्या आदिवासी समाजाविषयी माहिती जाणून घेण्यात आली. या सर्व माहितीचे सर्व मुलांनी कुतूहलपणे श्रवण केले. या लोकांचे राहणीमान, खान-पान, चालीरीती या सर्वांची माहिती आत्मसात केली.                                  

     यावेळी शिरुर येथील नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर आणि डॉ. सोनाली भालेकर यांनी, त्यांची मुलगी अवनी हिच्या वाढदिवसानिमीत्त, ७० मुलांना मिष्टान्न भोजन दिले. यावेळी, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, सुवर्णा सोनवणे, गायत्री डिंगरे, अनिता शिंदे, छाया शेवाळे आदी महिला उपस्थित होत्या. सर्व उपस्थितांचे संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *