शिरूर कृ ऊ बा समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिक्रापूर : दि. 07/08/2021.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुक्यातील अग्रगण्य नेते, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांचे निष्ठावंत, प्रकाश (बापू) पवार यांच्यावर, त्यांच्याच गावातील लोकांकडून मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालाय.
       जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जी. पुणे या गावातील, पवार कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या अतिक्रमणाबाबत, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याच्या रागातून, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी, एका युवकाला शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       जातेगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे सदस्य राहुल पवार, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचे पुतणे आहेत. राहुल पवार यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार गोरक्ष पवार, शरद उमाप, नामदेव उमाप, निलेश उमाप, आप्पा मोरे व नवनाथ इंगवले या ग्रामस्थांनी, पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, यांचे सदस्यपद रद्द करण्याबाबतची मागणीही केलेली होती. त्यामुळे, चिडून जाऊन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, प्रकाश पवार यांनी गोरक्ष पवार यांना वारंवार फोन करून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे करण्याची धमकी दिली, शिवाय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, याबाबत गोरक्ष तुकाराम पवार, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
     गोरक्ष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत असेही म्हटले आहे की, गोरक्ष पवार यांचे भाडेकरू असलेल्या महिलेला देखील शिवीगाळ करून, खोली खाली करा अशी दमदाटी केली असल्याचे यात म्हटलेले आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, प्रकाश बाबासाहेब पवार, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या विरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पुढील अधिक तपास, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *