आदिवासी पश्चिम पट्ट्यात पाऊसा अभावी आवण्या खोळंबल्या आदिवासी शेतकऱ्यांची आर्तव हाक…

भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आंबेगाव तालुका आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पावसाने दांडी मारल्याने भात शेती धोक्यात आली आहे.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाने लवकरच सुरुवात केली. यावर्षी लवकर पाऊस असल्यामुळे भात पेरणी देखील लवकर झाली होती. परंतु भात लावणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दांडी मारली आहे. आंबेगाव  तालुक्यातील पश्चिम भागात भात लावणी खोळंबली असून पाऊसाअभावी भात रोपे पिवळी पडू लागली आहे. त्यामुळे बळीराजाची  चिंता वाढली आहे.

भात  हेच एक महत्त्वाचे आदिवासी शेतकऱ्याचे पिक असून त्यावरच त्यांची वर्षाची उपजिविका अंवलबून असते. पाऊसच नाही बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत आवण्या खोळंबलया पाणवल्या डोळ्यात ने शेतकरी पाऊसाच्या वाटेकडे एकटक नजर लावून बसला आहे.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *