२० महिन्यापासून पाहिजे असलेला व रेकॉर्डवरील सराईत आरोपी पुणे LCB च्या ताब्यात…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 04/06/2021.

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशाने, रेकॉर्डवरील पाहिजे असलेला फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक ४/६/२०२१ रोजी LCB टिमला मिळालेल्या माहितीवरून, शिरूर पो. स्टे. गु.र.नं.६४५/२०१९ भादंवि क. ३७६ प्रमाणे, रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी, यादी क्र.१००४ मधील आरोपी नामे – अतुल वसंत गिरे, वय २३ वर्षे, रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यास, टाकळीहाजी-निघोज रोड, ता. शिरूर, जि. पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन, त्यास पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

त्याच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, चोरी व आर्म ॲक्ट प्रमाणे खालील ४ गुन्हे दाखल आहेत –

१) सुपा (अहमदनगर) पो.स्टे. गु.र.नं.१३४/२०१६ भादंवि क. ३९५.
२) सुपा (अहमदनगर) पो.स्टे. गु.र.नं.१८/२०१६ भादंवि क. ३९४.
३) श्रीगोंदा (अहमदनगर) पो.स्टे. गु.र.नं. १९३/२०१९ भादंवि क.३८०, १८७.
४) मंचर पो.स्टे. गु.र.नं. ३६१/२०१८ आर्म ॲक्ट क. ३, २५.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,स. पो. नि. सचिन काळे,पो. हवा. विद्याधर निचित,
पो. हवा. महेश गायकवाड,
पो. हवा. निलेश कदम,
पो. हवा. सचिन गायकवाड,
पो. हवा. सुभाष राऊत,
पो. ना. गुरु गायकवाड,
चालक पोहवा. काशिनाथ राजापुरे
यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *