रस्ता व रोडच्या कडेला लाईटची सुविधा व्हावी यासाठी घोडेगाव ग्रामपंचायतकडे कुंदन काळे यांनी केली मागणी…

 
घोडेगाव,दि. ३०
आंबेगाव ब्युरोचिफ, मोसीन काठेवाडी
 
आंबेगाव तालुक्याची  प्रशासकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  घोडेगाव येथे मुख्येबाजारपेठ महाराणी चौक ते स्माशानभूमी रस्त्याची दुरवस्था व  बाजारपेठेच्या पुढे नदीकडे स्मशानभूमीकडचा रस्ता पुरेसी लाईटची सुविधा नसल्याने अंधार खासखळग्याचा व दगडगोठे व खड्डयाखुड्डयाचा झाल्याने रात्रीच्या वेळी अंत्ययात्रेला जाणाऱ्या नागरीकांची मोठी गैरसोय होते,अशी आतर्व हाक घोडेगावकरामधून येऊ लागल्याने  घोडेगाव ग्रामपंचायत कडे रस्ता व रोडच्याकडेला लाईटची सुविधा करण्याची मागणी शिवशक्ती क्रिडामडळ परांडाचे अध्यक्ष कुंदन अजित काळे यांनी केली आहे.


             घोडेगाव परिसर बिबट्या प्रवण क्षेत्र असुन येथे बिबट्याचा वावर वारंवार आढळुन आला आहे.
ग्रामपंचायत  कार्यालयामार्फत हायमस्ट दिवे बसविण्यात यावे आशी मागणी आपल्या अर्जात कुंदन काळे यांनी केली आहे. यावेळी घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे तसेच ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे उपस्थित होते. निधी उपलब्ध होताच,सदर कामे मार्गी लावून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.असे यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडुन सांगण्यात आले.