बातमी -प्रतिनिधी कैलास बोडके
पिंपरी पेंढार: जुन्नर तालुक्यात वाढत असलेला कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारी ( दि 18) पिंपरी पेंढार या ठिकाणी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करुन रॅपीडचाचणी करण्यात आले या सर्वेक्षणात एकूण 7400 जणांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 20 रुग्ण पाॅझिटिव्ह असून 70 रुग्ण संशयीत सापडले आहेत.
सध्या जुन्नर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शासनाने रॅपीड टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे.
शुक्रवार ( दि 18) जिल्हा परिषद आरोग्य विभाग व ग्रामपंचायत पिंपरी पेंढार यांच्यावतीने प्रत्येक घरोघरी जाऊन ही तपासणी करण्यात आली या तपासणी मोहिमेत थर्मामीटरद्वारे तापमान, ऑक्सीजन पातळी व इतर लक्षणांची तपासणी करण्यात आली त्यासाठी आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ किरण जाधव, डॉ आरती गीते, डॉ आकाश त्रिभुवन, लॅब टेक्निशिअन सयाजी काळे, रविंद्र अभंग, आरोग्य कर्मचारी दत्ता शेलार, जगदीश ताजवे, चंद्रभागा कुदळे, कामगार तलाठी संजय गारकर, आशा सेविका, जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 28 टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमने सुुुमारे 1546 कुटुंबातील नागरिकांची तपासणी करण्यात आली या तपासणीत 20 रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले तर संशयीत 70 रुग्ण सापडले आहे.
याप्रसंगी तहसीलदार हनुमंत कोळेकर, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गोडे, आदींनी याप्रसंगी भेट दिली.