घोडेगाव पोलिसांची जुगारावर मोठी कारवाई ,मटका घेणाऱ्या इसमासह ३ जणांवर गुन्हा दाखल. एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१९ सप्टेंबर २०२१

घोडेगाव

Accused Jagan Mahadu Aswale Ra. Kotmadara, Tal. Ambegaon, Dist. Pune, Somnath Tukaram Bamble Ra. Borghar Umberwadi, presently Ra. Pokharkar Building TN Kale Ra. Ghodegaon, Tal. Ambegaon, Dist. Pune are the names of those arrested.
आरोपी जगण महादु आसवले रा.कोटमदरा,ता.आंबेगाव,जि.पुणे ,सोमनाथ तुकाराम बांबळे रा. बोरघर उंबरवाडी, सध्या रा.पोखरकर बिल्डींग टि.एन काळे रा. घोडेगाव,ता.आंबेगाव, जि.पुणे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

घोडेगाव ता. आंबेगाव येथे मंचर भिमाशंकर रोडच्या कडेला डोंगरे हॉस्पीटलचे मागे असलेल्या ,मोकळया जागेत झाडाच्या आडोशाला अवैध जुगार अड्डयावर छापा टाकत, मटका घेणाऱ्या इसमासह ३ जणांवर ,घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २०२ / २०२१ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे-गुन्हा दाखल झाल्याची फिर्याद घोडेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक दत्तात्रय किसन जढर यांनी दिली आहे.
आरोपी जगण महादु आसवले रा.कोटमदरा,ता.आंबेगाव,जि.पुणे ,सोमनाथ तुकाराम बांबळे रा. बोरघर उंबरवाडी, सध्या रा.पोखरकर बिल्डींग टि.एन काळे रा. घोडेगाव,ता.आंबेगाव, जि.पुणे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहिती नुसार ,शनिवार दि.१८ रोजी ५ :३० च्या सुमारास घोडेगाव येथील मंचर भिमाशंकर रोडचे कडेला डोंगरे हॉस्पीटलचे मागे मोकळया जागेत झाडाचे आडोशाला जगण आसवले त्याचा साथीदार असे व त्याला सांगणारा इसम लोकांकडुन पैस घेवुन ,त्यांना चिट्टया देवुन कल्यान मटका नावाचा जुगार खेळवित असताना ,रोख रक्कम,जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व मोटार सायकल असा एकुण ५८१३० रुपयाच्या मुद्दे मालासह मिळुन आल्याने जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती घोडेगावचे प्रभारी साहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी दिली.

Ghodegaon Police Station
घोडेगाव पोलीस स्टेशन

या कारवाई मध्ये मिऴाला माल पुढील प्रमाणे, जगन आसवले यांच्या जवळ असलेल्या ५०० रू दराच्या १० नोटा, २०० रू दराच्या १२ नोटा, १०० रू.च्या १४ नोटा, १० रू.च्या २ नोटा. असे एकूण ९ हजार २० रू. रोख रक्कम मिळुन आले. सोमनाथ बांबळे यांच्या जवळ असलेल्या ५०० रू दराच्या ८ नोटा, २०० रू दराच्या ५ नोटा, १०० रू.च्या २० नोटा, ५० रू दराची १ नोट, २० रू दराच्या २ नोटा, १० रू.च्या २ नोटा. असे एकूण ७११० रू.रोख रक्कम चा समावेश आहे व तीन गुलाबी रंगाच्या पावत्या त्यावर कल्याण असे छापलेले व मटक्याचे आकडे लिहलेले, वही तसेच कोऱ्या पानावर कल्याण मटक्याचे आकडे लिहलेले वस्तू सापडले. तसेच जगन आसवले याचे ताब्यातील ओपो कंपनीचा एफ १९, सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी जे २ अँन्ड्रॉईड मोबाईल एकूण १५ हजार रू. किंमत जु.वा.की.अ.,सोमनाथ बांबळे याचे ताब्यातील सॅमसंग कंपनीचा एस.एम.बी 355 ई मॉडेलचा काळे रंगाचा बटनांचा मोबाईल २ हजार -रू.किमतीचा जु.वा.की.अ मिळुन आला,२५ हजार रू.किमतीची एक हिरो होडा पॅशन प्रो कंपनीची मो.सा.तिचा आर.टी.ओ.न. म.एच.१४ एक्स.८६४० जु.वा.की.अ. मिळाली ,३० रू किमतीचे ३ पेन त्यात एक निळे रंगाचा पेन, एक लाल रंगाचा पेन व एक हिरवे रंगाचा पेन असे एकुण ५८१३० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास साहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अविनाश कालेकर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *