माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन..

बातमी प्रतिनिधी
दत्ता गाडगे विभागीय संपादक

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीमधे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.११ डिसेंबर १९३५ ला पश्चिम बंगालमधील विरभूमीमधे त्यांचा जन्म झाला.२५ जुलै २०१२ ला त्यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणुन शपथ घेतली.२६ जानेवारी २०१९ ला त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.२००७ मधे पद्मविभूषण मिळाले.

देशाच्या राजकारणामधे त्यांनी संरक्षण,अर्थ,उद्योग,
दुरसंचार,आदी मंत्रीपदांच्या जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या.१९६९ मधे ते राज्य सभेचे खासदार झाले.१९८५ मधे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष,१९५२ ते ६४ पर्यंत ते काँग्रेसचे विधान परीषद सदस्य होते.

काँग्रेसचे संकटमोचक म्हणुन त्यांची ख्याती होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *