खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा जुन्नर तालुका दौरा

तालुक्यातील धरणांमधील लवकरच गाळ काढणार

आणे: खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते जुन्नरच्या पूर्व भागातील शिंदेवाडी येथील इटकाईमळा तास ओहोळ तलाव,बांगरवाडी पाझर तलाव,ढगीमळा-इनामदार मळा येथील के.टी बंधारा,आनंदवाडीतील पाझर तलाव जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला.तसेच आणे येथील अंबिका माता मंदिर चौक काँक्रीटीकरण व अंबिकामाता मंदिर ते आहेरवस्ती रस्ता डांबरीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.त्याच बरोबर बेल्हे,राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन खासदारांनी समस्या जाणून घेतल्या. राजुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची पहाणी केली करून गावातील अंगणवाडीत मुलांना पोषण आहाराचे वाटप केले. यावेळी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,शरद लेंडे,माजी सभापती दीपक आवटे,धोंडिभाऊ पिंगट,राजुरी गावचे सरपंच एम डी घंगाळे,बेल्हे गावचे सरपंच राजाभाऊ गुंजाळ,आणे गावचे सरपंच प्रकाश बोरा, बाळासाहेब खिलारी, प्रशांत दाते, डॉक्टर दीपक आहेर, अनघा घोडके, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी घेतलेला आढावा.