वन्यजीव सप्ताहनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेला व्याख्यान कार्यक्रम संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
८ ऑक्टोबर २०२१

घोडेगाव

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आणि वनविभाग घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव हे होते.या प्रसंगी वनविभागाचे श्री.टी.एन कदम यांनी मार्गदर्शन केले.ते आपल्या भाषणात म्हणाले की,जंगलातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण झाले पाहिजे. तसेच वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.या संदर्भातील काही व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवल्या. याप्रसंगी श्री.संपत तांदळे,श्री.अशोक मते, डॉ.माणिक बोऱ्हाडे,होनराव मॕडम इ.उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वल्लभ करंदीकर यांनी केले तर प्रा.डॉ. गुलाबराव पारखे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *