अवैध गुटखा विक्रेत्यांवर शिरूर पोलिसांकडून कारवाई : 1,36,035 रु. किंमतीचा गुटखा जप्त : सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक, शिरूर

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
७ ऑक्टोबर २०२१

शिरूर

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध्य गुटखा विक्री करणाऱ्यांवर, शिरूर पोलिसांनी विविध तीन ठिकाणी छापे टाकत, सुमारे 1 लाख 36 हजार 35 रु. किंमतीचा गुटखा हस्तगत केलाय.

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन विविध ठिकाणी एकाचवेळी व वेगवेगळ्या पथकांनी छापा टाकत, अशा अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर ६ ऑक्टोबर २०२१ रोजी कारवाई करण्यात आलीय. त्यानुसार आमदाबाद फाटा येथील सिद्धिविनायक किराणा दुकानावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत, दुकान मालक मुकेश शेषराम चौधरी, वय २५ वर्ष याच्याकडे ६४५५/- रु. किंमतीचा अवैध गुटखा मिळून आला.

पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध्य गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

दुसऱ्या पथकाने शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळा, शहिद स्मारकाच्या मागील बाजूस असणाऱ्या टपरीमध्ये छापा टाकत, १) राहुल गौतम कांबळे, वय २५ वर्ष, २) इरफान हब्बी अन्सारी, वय २५ वर्ष, ३) सोहेल शफिक तांबोळी, वय २३ वर्ष यांच्याजवळ सुमारे १००७ रुपयांचा गुटखा मिळून आला.
तिसऱ्या पथकाने बोऱ्हाडे मळा, (रामलिंग) अमोल डेअरी येथे छापा टाकत १) गणेश हनुमंत मजरकर, वय २५ वर्ष, २) धीरज मंगलाराम प्रजापती, वय २४ वर्ष, ३) रफिक शेख, ४) बापू बोऱ्हाडे, सर्व राहणार शिरूर यांच्याजवळ सुमारे १,२८,५७३/- रु. किंमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आलाय.
एकाच वेळी वरील तिन्ही ठिकाणी अचानक छापे टाकत, सुमारे १,३६,०३५/- रु कींमतीचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केलाय. यात विमल, हिरा व इतर गुटख्याच्या प्रकारांचा समावेश आहे.

वरील ८ आरोपितांवर वेगवेगळ्या ३ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी ६ जणांना शिरूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ०९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सहाय्यक फौजदार नजीम पठाण, पो. ह. अमित कडूस, पो. ह. संजय जाधव, पो. ना. धनंजय थेऊरकर, पो. ना. नितीन सुद्रीक, पो. ना. बाळू भवर, पो. कॉ. वैभव शेलार, पो. कॉ. आकाश नेमाणे, पो. कॉ. राजेंद्र गोपाळे, चालक पो. कॉ. शंकर चव्हाण या टीमने ही कारवाई केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलीय.

Shirur police cracks down on illegal gutka sellers: Rs 1,36,035 Gutkha of value seized: Suresh Kumar Raut, Inspector of Police, Shirur
अवैध गुटखा विक्रेत्यांवर शिरूर पोलिसांकडून कारवाई : 1,36,035 रु. किंमतीचा गुटखा जप्त : सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक, शिरूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *