देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं – देवेंद्र फडणवीस

०६ डिसेंबर २०२२


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम केलं. व्यक्तीला समान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही, असं संविधान त्यांनी दिलं. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमी इथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आहे. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. व्यक्तीला सामान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही असं संविधान त्यांनी दिलं. आज आपला देश प्रगती करत आहे कारण लोकशाही जिवंत आहे. ‘एक मार्ग एक संधी’ संविधानाने उपलब्ध करुन दिली. त्यांचे आभार मानण्याकरता आपण सगळे जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *