बेळगाव महानगर पालिकेवर भाजपचे वर्चस्व; राउतांच्या वल्गना हवेत विरल्या

आकाश नलवडे
पुणे प्रतिनीधी
दि.07/09/2021

“आमचे 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील” – संजय राऊत.

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या, बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला, स्पष्ट बहुमत मिळालं आहे. हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 36 आाकड्याची मॅजिक फिगर भाजप ने ओलांडली आहे. भाजपने या निवडणुकीत अतिशय ताकदीने, आणि आक्रमकरित्या प्रचार केला होता. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा, फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न, मात्र भंगलं आहे.

भाजप – ३६, काँग्रेस – ९ तर MIM – १, अपक्ष – १०, महारष्ट्र एकीकरण समिती – २

या निवडणुकीत मतदानाचा टक्का, घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. “आमचे 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील,” असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर, आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. 58 प्रभागात 385 उमेदवार आपलं नशीब आजमवत होते. तसेच निकाल जाहीर झाला असून त्यात भाजप – ३६, काँग्रेस – ९ तर MIM – १, अपक्ष – १०, महारष्ट्र एकीकरण समिती – २ असे निकाल जाहीर झाले आहेत.

 

BJP 36, Congress 9 and MIM 1 Independent 10 Maharashtra Unification Committee 2
भाजप – ३६, काँग्रेस – ९ तर MIM – १, अपक्ष – १०, महारष्ट्र एकीकरण समिती – २

बेळगाव महानगरपालिकेत भाजपने, बहुमत सिद्ध केले आहे. बेळगाव महानगरपालिकेसाठी ३६ ही मॅजिक फिगर आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने इतिहास रचला आहे.

महाविकास आघाडीतील सगळे पक्ष स्वतंत्र लढले तर 100% फायदा भाजपलाच होणार

जर पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढले तर भाजपला सत्तेवरून पायउतार करू शकतात, असे जाणकार सांगतात.
जर महाविकास आघाडीतील सगळे पक्ष वेगवेगळे लढले तर मतदानाची विभागणी होऊन त्याचा 100% फायदा भाजपलाच होणार आहे. निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढून निकालानंतर एकत्र येणाचा निर्णय नक्कीच, महाविकास आघाडीच्या अंगाशी येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *