मंचर येथे गोळीबार करून, खून करणाऱ्या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मंचर : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

      मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एकलहरे गावच्या ठिकाणी राहत असलेल्या ओंकार उर्फ राण्या बाणखेले याची डोक्यात पिस्टलने गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल होती. सदर प्रकार गंभीर असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्या बाबत माननिय पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांनी आदेश दिल्याने सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडून समांतर तपास चालू होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून फरार असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मा. पद्माकर घनवट,यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी रामा जाधव हा राजगुरुनगर खेड येथे येणार आहे. व नंतर पर राज्यात पळून जाणार आहे तेव्हा मिळालेल्या बातमीनुसार ,स्थानिक गुन्हे शाखेचे टीमने खेड एसटी स्टँड येथून एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राम सुरेश जाधव, वय 22 वर्ष, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे. असे सांगितले. तरी त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
              सदरची कारवाई,मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख , मा. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी अनिल लंभाते  यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट
सहायक पोलिस निरिक्षक. नेताजी गंधारे,अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे,फौजदार पठाण            हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर,दिपक साबळे,
राजू मोमीन, संदिप वारे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, बाळासाहेब खडके,राजापुरेचे सहायक. फौजदार,प्रमोद नवले केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *