शिवसेना शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक लांडेवाडी येथे संपन्न…

आंबेगाव प्रतिनीधी
दि.11/07/2021

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेवरून रविवार दि.११ जुलै २०२१ रोजी लांडेवाडी ता.आंबेगाव येथे स.११ वा. ‘शिवसेना शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक’ झाली…

यावेळी जिल्हाप्रमुख मा.आमदार शरददादा सोनवणे यांचा शिवसेना संपर्कप्रमुख मा.खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला…

शिवाजी आढळराव पाटील शरद सोनवणे यांनी शिवसैनिकांना पक्ष वाढीचे दृष्टीने मार्गदर्शन केले…यावेळी आंबेगांव शिवसेना तालुका प्रमुख अरूण गिरे तसेच आंबेगाव -शिरुर तालुक्यातील शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *