आमदार नितेश राणे यांच्याविरोधात निदर्शने
दि. १४/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह विधान केले होते. याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवार (दि.13) रोजी शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘हल्लाबोल हल्लाबोल नितेश राणे हल्लाबोल… चप्पल लेके हल्लोबोल, पत्थर लेके हल्लाबोल… दंडा लेके हल्लाबोल..’ ‘माफी मागो माफी मागो नितेश राणे माफी मागो…’ अशी घोषणाबाजी करून यावेळी तीव्र निषेध केला.
शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह माजी महापौर संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहर अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, प्रवीण भालेकर, अतुल शितोळे, माजी नगरसेविका निकिता कदम, संगिता ताम्हाणे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, या आंदोलनात पुष्पा शेळके, संतोष निसर्गंध, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, गंगा धेंडे, अकबर मुल्ला, रशीद सय्यद, कविता खराडे, संगिता कोकणे, दिपाली देशमुख, पुनम वाघ, दत्तात्रय जगताप,मनिषा गटकळ, आशा शिंदे, विशाल जाधव, विश्रांती पाडाळे, शेखर काटे, युवराज पवार, सचिन औटे, युसुफ कुरेशी, मंगेश बजबळकर, शिला भोंडवे, उत्तम कांबळे, सोमनाथ मोरे, दीपक गुप्ता, ओम क्षिरसागर, शिवाजी पाडूळे, किरण नवले, मीरा कदम आदी उपस्थित होते.