गाडीला ओव्हरटेक केल्याच्या वादातून पीएमपी बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये हाणामारी
१४ नोव्हेंबर २०२२
पुणे
पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये वाद झाला आणि या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. पुणे स्टेशन परिसरात काल (13 नोव्हेंबर) घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. चालक, कंडक्टर आणि दुचाकीवरील व्यक्ती यांच्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसात पीएमपी चालकांवर हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले.