शहरात आता मांजर पाळण्यासाठी लागणार परवाना

१० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घरामध्ये कुत्रा पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागत आहे . त्यासाठी ऑनलाइन सुविधाही पालिकेने करून दिली आहे . त्यापाठोपाठ आता घरामध्ये मांजर पाळण्यासाठीही महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे . त्यानुसार घरामध्ये मांजर पाळण्यासाठी ७५ रुपये शुल्क नागरिकांना द्यावे लागणार आहे . महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत श्वान मालकास श्वान परवाना दिला जातो . त्याप्रमाणे पाळीव मांजरास परवाना दिल्यास त्यांची माहिती संकलित होईल , तसेच त्यांचे आरोग्य उपाययोजना व उपद्रवाबाबतच्या व नियोजन पाळीव विभागामार्फत महापालिकेला करता येईल. यासाठी मांजरांसाठीदेखील ऑनलाइन परवाना दिला जाईल. श्वानाप्रमाणे मांजरासाठी नवीन परवाना देण्यासाठी ७५ रुपये , नूतनीकरणासाठी ५० रुपये आणि विलंब शुल्क १० रुपये आकारण्यात येणार आहे.

परवानाधारक पाळीव मांजरांसाठी विविध अटी – शर्ती महापालिकेने घालून दिल्या आहेत . परवान्यासाठी एक वर्षाचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे . त्यानंतर दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागेल . ज्या नागरिकाला मांजर पाळायचे आहे , त्यांना दिलेला परवाना सोबत ठेवावा लागेल. ज्यावेळी प्राधिकृत अधिकारी परवान्याची मागणी करेल , त्यावेळी तो परवाना दाखवणे बंधनकारक असणार आहे . मांजराला मोकळ्या जागेत सोडू नये , तसेच मांजरापासून कोणत्याही प्रकारचा उपद्रवं होणार नाही . याची काळजी नागरिकांना घ्यावी लागणार आहे . मांजर पाळण्यास ऑनलाइन पद्धतीने परवाना देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *