दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर, हे योग्य नाही; किशोरी पेडणेकर यांची अब्दुल सत्तारांवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२


शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. दरम्यान, सत्तार यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर आपले वलय निर्माण केले आहे. सत्तार बेगडी हिंदूत्व घेऊन अशी वक्तव्य करत आहेत, असे पेडणेकर म्हणाल्या.

सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवून स्वत:चे वलय निर्माण केले आहे. त्यांनी मतदारांशी प्रामाणिकपणा ठेवलेला आहे. सुप्रिया सुळे या आदर्श घेण्यासारख्या आहेत. त्यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. सत्तार बेगडी हिंदुत्व घेऊन महाराष्ट्रात नाचत आहेत. ते मंत्री आहेत. मात्र ज्या शब्दाचा उच्चार केला जाऊ शकत नाही, असा शब्द त्यांनी वापरला आहे. दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर, हे योग्य नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *