ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट BF.7 धोकादायक, ही आहेत लक्षणे

पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२


ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. हा BF.7 सबव्हेरियंट धोकादायक असून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने चिंता वाढवली होती. सध्या त्याचा धोका कमी झाला आहे. पण आता त्याच्या नवीन उपप्रकाराने डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा नवा सबव्हेरियंट BF.7 यांमुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ही आहेत लक्षणे –

घसा खवखवणे
डोकेदुखी
खोकला
नाक चोंदणे
सर्दी
शिंकणे
घोगरा आवाज
थकवा
अंगदुखी


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *