रक्षणास सिद्ध त्यांचा गणवेश खाकी; त्यास बहिणींनी बांधली राखी–!

आपला आवाज :बातमी 

१३ ऑगस्ट २०२२

पुणे।प्रतिनिधी, 

                      ‘पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी बंधू आणि भगिनीआपणा सर्वांच्या रक्षणासाठी सदैव जागरूक आणि सिद्ध असतात.खऱ्या अर्थाने ते आपले रक्षणकर्ते भाऊ आहेत.म्हणून प्रेमाने आपण त्याना राखी बांधत आहोत–‘ या शब्दात श्रीराम योगा परिवाराच्या सदस्य शुभांगी साठे आणि मीनाक्षी पायगुडे इ.भगिनींनीआपल्या भावना व्यक्त केल्या.प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि श्रीराम योगा परिवाराचे अध्यक्ष श्री.भानुदास पायगुडे यांनीआज पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बंधू भगिनींसाठी खास रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी या भगिनी बोलत होत्या.या समारंभाला प्रसिद्ध हास्यकवी आणि ज्येष्ठ एकपात्री कलाकार बंडा जोशी यांची विशेष उपस्थिती होती.त्यांचा आज वाढदिवस होता.त्या निमित्त,त्यांचेही अभिष्टचिंतन परिवारातर्फे करण्यात आले.श्रीराम योगा परिवारातर्फे गरीब आणि गरजू महिलांना साडीवाटप, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण असे अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने केले जातात.त्याचाच एक भाग म्हणून हा रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक श्री.मुलाणी यांच्यासह अनेक स्त्री-पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना परिवाराच्या भगिनींनी राखी बांधल्या आणि पेढे बर्फी वाटली.पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी श्रीराम योगा परिवारातील सदस्यांचे आभार मानले.
‘आम्ही तुम्हा सर्वांच्या कुटुंबांच्या जीवित आणि मालमत्तेचे प्राणपणाने असेच अखंड अविरत रक्षण करीत राहू.कारण आम्ही आपले रक्षणकर्ते बांधव आहोत. भावाबहिणीचं हे अक्षय नाते आपण सदैव निभावू या-!’ असे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वचन दिले. यावेळी सुनीता एकलदेवी,अलका चौगुले,मराठा महासंघाच्या सुधा पाटील, अंजली पवार,कांचन उत्तेकर, शिवानी पायगुडे मिनाक्षि पायगुडे,जयश्री अवचट, सुनिता एकलदेवी, सुधाताई पाटील,अंजली पवार,चंद्रलेखा प्रकाश तांबे,शुभांगी साठे, चंद्रकांत सस्ते,दिलीप ढमालेउपस्थित होते.
                                                             या निमित्ताने विनोदी कलाकार बंडा जोशी यांनी काही विनोदी किस्से सांगून एकच धम्माल उडवून दिली आणि खळखळून हसत या कार्यक्रमाची गोड सांगता झाली.या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम योगा परिवाराचे अध्यक्ष भानुदास पायगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. प्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक विजय सातपुते यांनी या समारंभाचे खुसखुशीत सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *