आळेफाटा परीसरात घरफोडी व चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२५ मे २०२२

आळेफाटा


आळेफाटा(ता. जुन्नर )परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कीआळेफाटा बसस्थानकामध्ये दि.१८ एप्रिल २०२२ रोजी जनाबाई दादाभाऊ खिल्लारी राहणार दिवा जि.ठाणे या बसमध्ये चढत असताना त्या ठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समध्ये असलेले ५० हजार रूपये रोख रक्कम व १४ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकुन सात लाख पन्नास हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची फिर्याद जनाबाई खिलारी यांनी दिली होती या फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्य़ातील तपासादरम्यान आळेफाटा पोलीसांनी आळेफाटा परिसरात आपले गाव आपली निगराणी या मोहिमेंतर्गत सुमारे ४०० सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असुन पोलीस पथकाने एस.टी.स्डॅडवर बसविण्यात आलेल्या सी.सी.फुटेज ची पहाणी केली असता त्यामध्ये इंडीका कार मधील तिन महीला व एक पुरूष इसमांची हालचाल हि संशयास्पद दिसली .त्यानुसार पोलीस पथकाने श्रीरामपूर येथे जावुन दि.१८ – ४- २०२२ रोजीपासुन दि.१९ मे पर्यत तेथे इंडिका कार बाबत गोपनीय माहीती मिळवुन वेशांतर करून हि कार कोण वापरत आहे याबाबतचा ठोस माहीती मिळवुन गुन्हा घडल्यापासून सदर इसमांची पुर्ण माहीती घेवुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून ते ज्या वस्तीत रहात आहे त्यावर येणा-या जाणा-या रोडवर लक्ष ठेवुन होते.

दरम्यान सदरचे इसम हे दि.१९ रोजी गणेश चतुर्थी असल्याने राजुर जिल्हा जालना येथे गणपती मंदिर परिसरात चोरी करण्यासाठी जात असल्याची माहीती गोपनीय माहीती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांणा मिळाल्याने त्यांनी सदर आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्याने दि.१९ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदरची इंडिका कार एम.एच.१७ व्ही .३९१ हि इंदिरानगर श्रीरामपूर येथुन निघाली असता त्या ठिकाणी साध्या वेशात असलेले पोलीस हवालदार विनोद गायकवाड,अमित माळुंजे यांनी कारचा पाठलाग करत असताना याबाबतची आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये कळवली असता त्यांच्या मदतीला अजुन पथक पाठवण्यात आले या कारचा पोलीसांनी १२५ किलोमीटर पाठलाग करून त्यांना औरंगाबाद जिल्ह्य़ातील वाळुंज येथे पकडण्यात आले असुन संजय भानुदास सकट (वय ४६ ) नंदा संजय सकट (वय ३५),परीघा नाना राखपसरे (वय६०),शोभा प्रताप खंदारे (वय ५५)हे सर्वजण राहणारे इंदिरानगर, श्रीरामपूर जि अहमदनगर असे असल्याचे समजले त्यांना आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस तपासात या टोळीने यापुर्वी आळेफाटा परीसरात ८ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांनी गुन्ह्य़ात चोरी केलेले एकुण २४ तोळे सोने व १५ तोळे चांदी असे सतरा लाख अठ्ठावन्न हजार रूपयांचे माल जप्त करण्यात आले असुन त्यांचाकडुन चोरीचा माल खरेदी करणारे विकास सुरेश कपिले (वय३४) सलबतपुर ता.नेवासा जिल्हा अहमदनगर, जगदीश गजानन देवळालीकर (वय ४०)रामचंद्र कुंज जि.अहमदनगर या सराफ व्यवसायिकांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, महीला पोलीस निरीक्षक रागीणी कराळे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, लहानु बांगर, भिमा लोंढे,प्रकाश जढर,अमीत माळुंजे,हनुमंत ठोबळे, मोहन आनंदगावकर, दळीफळे,होमगार्ड प्रतिक जोरी,पोलीस मित्र संदीप गडगे,विजय ताजणे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *