जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.6/06/2021
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात
शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा
बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.या वेळी लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती जनतेसाठी कसे राज्य निर्माण करावे ते रयतेचे राज्य कसे असावे अश्या अनेक आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला.महाराजांना जाणून घेऊन त्यांचे विचार भक्ती त्याग शेतकऱ्यानं विषयी असलेली भावना या अश्या शिव छत्रपती राजेंना मानवंदना देऊन ठीक ठिकाणी शिवगुढी उभारून व शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ला अभिषेक करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.बांगरवाडी येथे शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवगुढी उभारली. तसेच
शिवगर्जना देत मोठ्या उत्सहात व दिमाखात हा सोहळा ग्रामपंचायतिच्या वतीने पार पडला. या वेळी सरपंच जालिंदर बांगर, ग्रामसेवक अजित कुंभार, निलेश बांगर, राजू बिचारे, बबन रोकडे, संतोष बांगर, माजी सरपंच श्रीराम गोसावी हजर होते.तर नळवणे येथे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,
सरपंच अर्चना उबाळे,
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, माजी सरपंच प्रकाश ताजवे, ग्रामनेते बाबाजी शिंदे, ग्रामसेवक बढे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गगे, पांडुरंग गगे, हौशीराम शिंदे, पोपट उबाळे,शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.