भेकर जातीचे वन्यप्राण्याची शिकार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१८ मे २०२२

भीमाशंकर


मंगळवार दिनांक १७/५/२०२२ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी रामा शांताराम कोकरे रा. भिमाशंकर ता.खेड जि. पुणे यांची चौकशी केली असता भेकर जातीचे वन्यप्राणी मारलेचे चौकशी मध्ये आढळून आले या प्रकरणी आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा तपास चालू आहे सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण १९७२ वन अधिनियमा अन्वये वन गुन्हा WL – ०१/२०२२-२३ दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भिमाशंकर अभयारण्य १ यांनी दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी भिमाशंकर अभयारण्य १ कार्यालयाची कार्यवाही १ जण ताब्यात,२ फरार

सदर वनगुन्ह्याची कार्यवाही उपवनसंरक्षक (वन्यजीव) पुणेचे तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक वनसंरक्षक भिमाशंकर अभयारण्य स्थित मंचर अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण भिमाशंकर अभयारण्य १ हे पुढील तपास करीत आहे. या तपास कामी वनपाल नारायण गिऱ्हे,एस व्हि होले , एस एस लवंगे , ए ए भालेकर , एस एस ससाणे , आर एन मुरुडकर, के एस नायकोडी , व्हि डी निर्मळ , एम आर बनसोडे , व्हिडि तांबारे आदिनीं तपास कामी कार्यवाही केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *