दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी : कृष्ण प्रकाश

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ मे २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर  दिवसभर व्हायरल होत होता.

सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखिल वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम , आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारचे विघ्नसंतोषी लोकांचे आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे, तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की “ मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाई मुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही. “पिंपरी चिंचवड चे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा खुलासा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *