पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर उत्साहात, १५८ जणांनी घेतला लाभ, रुग्ण वाहिकेचे लोकार्पण

राजू थोरात
बातमी प्रतिनिधी
७ जानेवारी २०२२

तासगाव


पत्रकार संघाच्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण…

तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने तासगाव तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात गुरुवारी संपन्न झाले. दत्तमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्धाटन झाले. यावेळी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. या शिबिरात १५८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबिरात डॉ.शिवाजी पाटील नवजीवन तासगाव, डॉ.प्रविण शिंदे, श्री हॉस्पिटल तासगाव, डॉ. शरद सावंत, आदित्य हॉस्पिटल सांगली, डॉ.आदिती पटवर्धन, सरसेनापती परशुराम भाऊ पटवर्धन आय क्लिनिक सांगली, डॉ.अमर म्हस्के, म्हस्के आय हॉस्पिटल तासगाव, डॉ.अंजली सरस्वती आनंद हॉस्पिटल तासगाव, पाटील, डॉ.विद्यासागर कांबळे, सुश्रुत हॉस्पिटल तासगाव, डॉ. प्रशांत पाटील, प्राजक्ता हॉस्पिटल तासगाव, डॉ. शिवाजी गोसावी, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय तासगाव, डॉ. दिलीप लवटे, डॉ. साहिल जमदाडे, ग्रामीण रुग्णालय तासगाव, डॉ.अतुल पाटील, एकदंत हॉस्पिटल तासगाव, डॉ.सयाजी झांबरे जिल्हा व्यवस्थापक महालॅब सांगली, संगीता पाटील तालुका व्यवस्थापक महालॅब तासगाव, या वैद्यकीय तज्ञांनी व त्यांच्या टिम ने वैद्यकीय सेवा दिली. यावेळी पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या, शुगर, स्त्री रोग, दंतरोग, ईसीजी, हाडांच्या व्याधी, डोळे तपासणी, जनरल सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मुख्याधिकारी पाटील यांनी पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. येथील पद्म भूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी शिबिरात व्यवस्थापन करून सेवा दिली.

शिबिराचे संयोजन पत्रकार संघाचे संस्थापक संजय माळी, अध्यक्ष विष्णू जमदाडे, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव प्रदीप पोतदार, खजिनदार चंदू शिकलगार, संचालक – तानाजी जाधव, संजय काळे, विनायक कदम, प्रमोद चव्हाण, प्रशांत सावंत, उत्तम जाणकार, हंबीरराव पाटील, अमोल तुंगे, संकेत पाटील, दत्तात्रय संकपाळ, राजाराम माळी, गजानन पाटील, मिलिंद पोळ, उल्हास सूर्यवंशी, गजानन खेराडकर, प्रशांत चव्हाण, सतीश जमदाडे, संदेश भंडारे, राजू थोरात, शशिकांत डांगे, अमोल माने, आबासाहेब चव्हाण, विक्रम पाटील, अजय जाधव, संजय वडे, सुजित खोत, प्रणिता म्हस्के, योगिता माने, अधिकराव लोखंडे, तानाजी शिंगाडे, चंद्रकांत गायकवाड तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, मदतनीस, पत्रकार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या शिबिरात तासगाव तालुका पत्रकार संघाच्या अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोरोना काळात रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णांचे झालेले मृत्यू पाहून रुग्णवाहिकेची खरेदी करण्यात आली आहे. अत्याधुनिक अशी कार्डियाक रुग्णवाहिका सेवेत रुजू करण्यात आली. या उपक्रमाचे मुख्याधिकारी व डॉक्टर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *