बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास नारायणगाव पोलिसांकडून अटक

नारायणगाव :- (किरण वाजगे)
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कांदळी गावातील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रासमोर बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका इसमास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार रु किमतीचे एक सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले पिस्तूल व २ लाख रु किमतीची रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल असा २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
सागर अरुण चौगुले (वय २८ वर्षे रा. शुक्रवार पेठ जुन्नर,जि.पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक रोड वरील कांदळी गावच्या हद्दीतील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रासमोर एक इसम खाकी रंगाच्या बुलेट मोटरसायकलवर त्याचे ताब्यात गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने सहाय्यक पो निरिक्षक ताटे,पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे व दोन पंच रवाना होऊन संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती केली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा पिस्तूल व एक बुलेट मोटरसायकल (क्र एम एच १४ के के २१४७) जप्त करण्यात येऊन त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मोहरे करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक
मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी
मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *