शिरूर येथे पत्रकारांचा सन्मान; वैभवी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

दि. ०९/०१/२०२३

शिरूर

रवींद्र खुडे : विभागीय संपादक


शिरूर : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच नूतन वर्षारंभ व मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिरूर येथील वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था व वैभवी महिला बचतगट महासंघाने नुकताच पत्रकारांचा सन्मान शिरूर येथे केला.

त्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त भूगोल विभाग प्रमुख व भूगोल विषयाच्या महाविद्यालयीन संदर्भ ग्रंथांचे सूप्रसिद्ध लेखक प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार प्रवीण गायकवाड, मुकुंद ढोबळे, प्रा. रवींद्र खुडे, अभिजित आंबेकर, अनिल सोनवणे, पोपट पाचंगे, अर्जुन बढे आदी पत्रकार उपस्थित होते.

पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा यशवंत पाचंगे, उपाध्यक्षा नंदा खैरे, सचिव राजश्री ढमढेरे, संचालिका मिरा काळे, आरती शिंदे, राधा जाधव, नीलिमा मोहाडे, सुषमा शितोळे, सुनीता भनगडे, शीतल खैरे यांच्या हस्ते पत्रकारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अरुणा महाजन, शोभा जगदाळे, मनीषा आंबेकर, सोनाली सरोदे, विजया टेमगिरे, जयश्री जगताप, रोचना धापटे, सुनीता चौगुले, सविता दसगुडे, सुरेखा भाटी आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

त्याचप्रमाणे देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनाही वैभवी पतसंस्थेच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून दिनदर्शिकेची प्रत दिल्याचे अध्यक्षा पाचंगे यांनी सांगितले.
तसेच पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळेच आम्ही करता असलेल्या महिला सबलीकरणाच्या कार्याला बाळा मिळत असल्याचे तसेच त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून असल्याचे यावेळी बोलताना अध्यक्षा पाचंगे यांनी सांगितले.

संगिता रोकडे यांनी यावेळी थोर समाजसेविका व महिलांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना चोभे यांनी केले तर आभार संगीता धोंगडे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *