गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

दि. २६/१२/२०२२
पुणे


पुणे : पुणे महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या गांधीभवन टाकीवरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करण्याऱ्या लाईनला फ्लो मीटर बसविण्याचे काम गुरुवारी केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर :- महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी. रोड वरील भाग,
२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर :- बावधन, गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसा., विद्यान नगर, पाषाण रोड वरील डावा, उजवा भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *